गावठी हातभट्टीची 18 हजाराची दारु जप्त

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-शहरातील झिपरु अण्णानगर व वाल्मिक नगरातून शानिपेठ पोलिसांनी गावठी हातभट्टीची 18 हजारांची दारू जप्त केली आहे.
दरम्यान अवैध दारू विक्री करणार्‍या महिला व तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुध्द शानिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झिपरु अण्णा नगरा व वाल्मिकनगरात अवेधरित्या दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाली. शानिपेठ पोलिसांच्या पथकाने झिपरु अण्णा नगरात धाड टाकून सरला पवार या महिलेला ताब्यात घेतले.

तिच्या ताब्यातून 12 हजार 600 रुपये किंमतीच्या 6 कॅन गावठी दारु तसेच 3 हजार 500 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या 69 बाटल्या मिळून आल्या आहे.

तसेच पोलिसांनी वाल्मिक नगरात धाड टाकली असता, राजेंद्र सोनवणे हा तरुण गावठी दारू विक्री करीत असतांना मिळून आला. त्यांच्या ताब्यातून 3 हजार रुपये किंमतीच्या दोन कॅन गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

दोन्हींकडून एकूण 18 हजार रुपयांची गावठी हात भट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे

शानिपेठ पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांच्या पथकातील पीएसआय पवन राठोड, मिलींद कंक, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, अनिल धांडे, सुनिता इंधाते, नरेंद्र ठाकरे यांनी केली. सरला पवार व राजेंद्र सोनवणे या दोघांविरुध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*