Type to search

जळगाव

जखमी गोविंदांवर मोफत उपचार – अवधूत चौधरी

Share

जळगाव –

दहीहंडी हा मानवी मनो-याचा चित्तथरारक खेळ काळजाचा ठोका चुकवणारा असतो. हंडी फोडताना मानवी मनोरे रचताना अनेक वेळा गोविंदा मनोरा कोसळल्यामुळे जखमीदेखील होत असतात. यावेळी दुखापत झालेल्या गोविंदांवर जळगाव शहरातील हाडवैद्य अवधूत चौधरी व त्यांचे कुटुंबीय मोफत उपचार करीत आहेत. येत्या दहीहींडी उत्सवात देखील ते गोविंदांसाठी मोफत उपचाराची सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवधूत चौधरी हे खेळाडूवरदेखील ते मोफत उपचार करीत असतात.

संपर्क साधा – जिल्हाभरातील दुखापत झालेल्या गोविंदांनी अस्थी संधनालय 605, विठ्ठलपेठ, पांजरापोळ टाकीजवळ, भ्रमणध्वनी क्रमांक 9423950433 येथे संपर्क साधावा, असे आवाहन चौधरींनी केले आहे.

रुग्णसेवेत धन्यता मानणारे हाडवैद्य कै.नामदेव सोनू चौधरी यांनी गोविंदा तसेच क्रीडापटूंवर मोफत उपचार करण्याचा सतत 40 वर्षे हा उपक्रम अखंडपणे राबवला. कालांतराने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ही कला त्यांचा मुलगा अवधूत चौधरी यांनी अवगत केली. त्यानंतर तेदेखील रुग्णांवर उपचार करू लागले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी हा उपक्रम पुढे अखंडितपणे सुरू ठेवला आहे. त्यासाठी त्यांना भाऊ संजय चौधरींसह नीतेश चौधरी, हिरालाल चौधरी, स्वप्नील चौधरी, पन्नालाल चौधरी, जगदीश मगरे, राजू हळदे, सुरज पाटील यांचे सहकार्य लाभत असते. अवधूत चौधरी यांचा या कार्याबद्दल विविध सामाजिक संस्थांतर्फे पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!