Type to search

जळगाव

दहीहंडीचा कार्यक्रम सागर पार्कऐवजी रामदास कॉलनी मैदानावर होणार

Share

जळगाव | दरवर्षी एल.के.गृपतर्फे होणारा दहीहंडीचा कार्यक्रम हा यावर्षी मोठा गाजावाजा न करता होणार आहे व यातील अर्धा खर्च हा पूरग्रस्तांसाठी रोख व धान्य, गहू, तांदुळ रुपात देण्यात येणार असल्याची माहिती एल. के. गृपचे संचालक व मनपाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि. २४ ला दहिहंडी कार्यक्रम होत असून हा कार्यक्रम सागरपार्क ऐवजी त्यापुढेच असलेल्या रामदास कॉलनीत हनुमान मंदिराच्या ग्राउंडवर होणार आहे. कार्यक्रमाच्या अर्ध्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी दहिहंडीचे बक्षीस हे ११ हजाराचे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार त्याची उंची ठरणार आहे. कार्यक्रमास वीर बाजी प्रभू मंडळ, विश्‍वंभर मित्र मंडळ, शिव ढोल पथक, प्रभात कॉलनी मंडळ, सुर्यमुखी हनुमान संस्था, स्वराज्य निर्माण सेवा, जुने जळगाव मित्र मंडळ, संस्कार बहु. मित्र मंडळ, युवक एकता मित्र मंडळ, स्वरराज साउंड मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!