बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला 11 वर्षानंतर अटक

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-जळगाव तालुका पोलिसात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हयातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 11 वर्षानंतर आज अटक केली आहे.
जळगाव तालुका पोलिसात हिरालाल साहेबु बारेला (रा. डोगल्यपाणी ता.नेवाली जिल्हा सेंधवा) याच्या विरुध्द बलात्काराचा गुन्हा सन 2006 मध्ये दाखल होता.

तेव्हापासून हा आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील सपोनि रविंद्र बागुल, सफौ. मनोहर देशमुख, दिलीप येवले, अशोक चौधरी, सतिश हाळणोर, महेंद्र पाटील, गफ्फारखा तडवी, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुनिल पाटील यांनी सापळा रचून हिरालाल साहेबू बारेला याला डोगल्यापाणी जि. सेंधवा येथून अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*