अडावद येथे गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त : एकास अटक

0
अडावद, ता.चोपडा । दि.2 । वार्ताहर-येथील यावल – चोपडा रस्त्यावर हाँटेल शुभम समोर आज सायंकाळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका इसमा कडून गावठी बनावटीचे 25 हजार रुपये किंमतीचे तसेच 2 हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस हस्तगत केले .
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या पथकाने ही कार्यवाही करीत अडावद पो.स्टे.ला गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करुन पुढील कार्यवाही साठी आरोपी व मुद्देमाल अडावद पोलिसांकडे स्वाधीन केले.

अडावद येथील अंकलेश्वर बर्‍हाणपुर राज्य मार्गावरील यावल रस्त्यावरील हाँटेल शुभम समोर आज दि. 2 रोजी सायंकाळी
एक इसम गावठी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.राजेशसिंह चंदेल यांना मिळाली. गुप्त माहीतीच्या आधारे सापळा रचून पथकाने फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला संशयित इसम अफजलखा ताहेरखा पठाण वय 37 रा.अडावद यांची अंगझडती घेतली असता सदर इसम त्याच्या कमरेस 25 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटिची पिस्तूल ( गावठी कट्टा ) व 2 हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस बाळगून होता.

त्यास अटक करुन त्याच्या विरोधात अडावद पोलिस स्टेशनला भाग 6 गु.र.न.32/17 भारतीय हत्यार कायदा 3/25 प्रमाणे नोंद करण्यात आली असुन आरोपीसह हस्तगत मुद्देमाल अडावद पो.स्टे.कडे स्वाधीन करण्यात आला.घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अदिक्षक दत्तात्रेय कराळे,अप्पर अदिक्षक बच्चनसिंग ,चाळीसगाव विभागाचे अप्पर अदिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी ,सहाय्यक फौजदार मनोहर देशमुख ,मुरलीधर आमोदकर,पो.हे.काँ.दिलीप येवले,रविंद्र गायकवाड ,सुभाष पाटील,पो.ना.रमेश चौधरी,महेंद्र पाटील,मिलींद सोनवणे,रामकृष्ण पाटील ,गफ्फार तडवी,विनायक पाटील,योगेश पाटील,मनोज दुसाने,सुनिल पाटील,महेश पाटील,चालक पो.ना.दीपक पाटील,प्रविण हिवराळे यांच्या पथकाने ही धडक कार्यवाही केली.

 

LEAVE A REPLY

*