Type to search

जळगाव फिचर्स

दुकानातील कर्मचार्‍याने परस्पर लांबवले 13 लाख

Share

जळगाव  –

स्टिल, सिमेंट व आसारीच्या दुकानातील व्यवहारांमधील वसुली करणार्‍या कर्मचार्‍याने 13 लाख 29 हजार 211 रुपये परस्पर लांबवले आहे. याबाबत त्यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत व्यापारी मनीष डालचंद अग्रवाल (वय 40, रा.आदर्शनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कॉम्प्लेक्समध्ये अग्रवाल स्टिल, सिमेंट व आसारीचे दुकान आहे. या दुकानात नोकर आकाश अरुण नाथबुवा (नवनाथनाथनगर, वाघनगर परिसर) हा पुरवठा केलेल्या मालाच्या पैशांची वसुली करीत होता.

अग्रवाल यांच्या दुकानातून शहरातील अनेक व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांना सिमेंट व आसारीचा पुरवठा करण्यात आला होता. आकाश अरुण नाथबुवा याने माल पुरवठा केलेल्या व्यापारी, व्यावसायिकांकडून पैसे वसुल केले होते. त्याने काही रक्कम मालक मनीष अग्रवाल यांना दिली होती. नाथबुवा याने उर्वरित 13 लाख 29 हजार 211 रुपये मालकाला न देता अफराताफर केली.

हा प्रकार मालक अग्रवाल यांना कळाला. परंतु, तोपर्यंत नाथ याने त्यांच्याकडील काम सोडून दिले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील आरोपी नाथबुवा जळगावात आल्याचे कळताच पोलिसांनी त्यास 3 रोजी सायंकाळी नवनाथनगर, वाघनगर परिसरातून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी न्या.अक्षी जैन यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.गिरीश बारगजे यांनी कामकाज पाहिले. तपास सहाय्यक फौजदार संभाजी पाटील करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!