Thursday, April 25, 2024
Homeजळगावगुरुनानक नगरातील हाणामारीप्रकरणी चौघांना अटक

गुरुनानक नगरातील हाणामारीप्रकरणी चौघांना अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद रोडवर सट्ट्यातून पैश्यांच्या वादातून तिघांना चार जणांनी बेदम मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना शनिपेठ पोलीसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

चौघांना आज गुरूवारी 28 रोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील गुरूनानक नगरात24 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडलेल्या लखन सारवान यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे यांनी कारवाई करत बालन्ना गवळी, कैलास कुंभार, सतिश सपकाळे, जितेंद्र राजू गवळी यांना गुजराल पेट्रोलपंप जवळून अटक केली.

तर अशोक ठाकूर हा फरार आहे. चौघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या