Type to search

Breaking News जळगाव

आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात नाही : नातेवाईकांचा आक्रोष

Share

शाम दिक्षितला न्याय मिळण्याची मागणी

जळगाव –

शहरातील देवदास कॉलनी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव शहर माजी मनसे पदाधिकाऱ्याचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधीत आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांसह मनसे पदाधिकारी व नागरीकांनी मोठी गर्दी केली असून नातेवाईकांचा मोठा आक्रोष होताना दिसत आहे.

शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सुध्दा रूग्णालयात हजेरी लावली असून ते सुध्दा शाततेचे आवाहन करत आहेत. व पोलीस प्रशासनाला आरोपीस अटक करण्यासाठी तत्काळ कारवाईच्या सूचना केल्या.

सदर घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल शहरात झालेली हानामारी, डोक्यात रॉड टाकून जबर जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच त्याच रात्री ही झालेली हत्या यामुळे पोलीस प्रशासनावर जनता ताशेरे ओढत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!