कानळद्यात महिलेकडून डीवायाएसपींना धक्काबुक्की

कानळद्यात महिलेकडून डीवायाएसपींना धक्काबुक्की

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मतदानाची प्रक्रिया सुरु असतांना वार्ड क्रमांक दोन मध्ये वाद सुरु असतांना डीवायएसपी याठिकाणी गेले असता त्यांना महिलेकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

चक्क डीवायएसपींना धक्काबुक्की झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाला असल्याची चर्चा सुरु होती. तसेच त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पोलिसाने हटकले असता पकडली कॉलर

तालुक्यातील कानळद्यात दुपारी वार्ड क्रमांक 2 मधील मतदान केंद्रावर महिला उमेदवाराचा पती प्रचार करीत असल्याने पोलिसांने त्याला हटकत त्याला केंद्रापासून दूर जाण्यास सांगितले. याचा उमेदवारास राग आल्याने महिला उमेदवाराने देखील पोलीस कर्मचा-याशी वाद घालून शिविगाळ केल्याने यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. याचवेळी महिलेने पोलीस कर्मचा-याची कॉलर देखील पकडल्याची घटना घडल्याने त्या महिलेसह तीच्या पतीला ताब्यात घेण्यात आले असल्याचे डीवायाएसपी कुमार चिंथा यांनी सांगितले.

आव्हाण्यात दोन गट भिडले

तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत 9 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान सुरु असतांना दुपारी 1 वाजेच्या सुमारास मतदारांना मतदान केंद्रावर घेवून जाण्याच्या कारणावरुन दोन गट समोरासमोर भिडले. त्यामुळे दोन्ही गटात तुफान हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच याच गावात दुपारी 2 वाजेच्या सुमारास उमेदवारांच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे हाणामारी झाल्याने काही काळ मतदानाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दिवसभरात याठिकाणी वादाच्या घटना घडल्यामुळे पोलिसांचा अतिरीक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता.

धक्काबुक्कीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

महिलेकडून डीवायएसपींचा धक्काबुक्कीचा व वाद घालण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यामुळे पोलिसांसह सर्वच बाबतीत अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असल्याने अनेकांनी अफवांचे देखील पेच उठविले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com