Friday, April 26, 2024
Homeजळगावनगरसेवकाच्या पत्नीस शिवीगाळ करत मारहाण

नगरसेवकाच्या पत्नीस शिवीगाळ करत मारहाण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील शिवाजीनगर येथील नगरसेवकाच्या पत्नीला संडास व सेप्टी टँक तोडण्याच्या वादातून सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी 1 जानेवारीला रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय घडली घटना

शिवाजी नगरातील वार्ड क्रमांक 2 चे नवनाथ दारकुंडे हे नगरसेवक आहे. शिवाजी नगर भागातील भुरे मामलेदार गट नगरसेवक दारकुंडे यांच्या हद्दीत आहे.

1 महिन्यापूर्वी संतोष पवार व अतुल हराळ यांच्यात रहदारीच्या रस्त्यावरील वाद असल्यामुळे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी समजूत घालून हा वाद मिटविला होता.

त्यामध्ये रस्त्यावरील संडास तोडून संतोष पवार यांनी 50 हजार रूपयांची मागणी अतूल हराळ यांच्याकडे केली होती आणि तसे ठरलेही होते.

दरम्यान 1 जानेवारी 2021 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास नगरसेवक दारकुंडे यांनी संतोष बाबुराव पवार यांना संडास व सेप्टी टँक तोडण्याबाबत सांगितले होते.

याचा राग मनात ठेवून नगरसेवक दारकुंडे यांच्या घरी नसतांना रात्री 8 वाजता संतोष बाबुराव पवार, राजू बाबुराव पवार, कलावती बाबुराव पवार, मनिषा राजू पवार, रोहिणी संतोष पवार, मनोहर अर्जून पवार, लखन राजू पवार सर्व रा. शिवाजी नगर, भुरे मामलेदार प्लॉट हे सर्व जण घरी गेले असता.

नगरसेवक दारकुंडे यांची पत्नी जोत्स्ना नवनाथ दारकुंडे यांना सर्वांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर झालेल्या झटापटीत संतोष पवार यांनी ज्येात्स्ना दारकुंडे यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्याचीमंगलपोत तोडून नुकसान केले आहे.

या सातजणांविरोधात गुन्हा दाखल

ज्योत्स्ना दारकुंडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात संतोष बाबुराव पवार, राजू बाबुराव पवार, कलावती बाबुराव पवार, मनिषा राजू पवार, रोहिणी संतोष पवार, मनोहर अर्जून पवार, लखन राजू पवार सर्व रा. शिवाजी नगर, भुरे मामलेदार प्लॉट सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या