Friday, April 26, 2024
Homeजळगावगोपनीय माहिती देणे पोलिसांना भोवले

गोपनीय माहिती देणे पोलिसांना भोवले

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचार्‍यांना खंडणीच्या गुन्ह्यातील पत्रकाराला गोपनिय माहिती देणे चांगलेच भोवले असून दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानंतर, आता त्याच खंडणीच्या गुन्ह्यात तिघांना सहआरोपी केले असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजन यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, या गुन्ह्यात कलम 109 वाढविण्यात आला आहे. प्रदीप चौधरी, शरद पाटील, दिनेश दंडगव्हाळ असे सहआरोपी केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

कायदेशीर कर्तव्याबाबत खोटा मजकूर सोशल मीडियावर प्रसिध्द करून बदनामीची धमकी दिली. त्याचप्रमाणे बदनामी थांबविण्यासाठी 50 हजार रुपये खंडणी मागून 25 हजार रूपयांची खंडणी एका व्यापार्‍याच्या मार्फत अंजिठा चौफुली येथील हितेश मोटर्सच्या कार्यालयात स्वीकारल्याप्रकरणी पत्रकार भगवान सुपडू सोनार (र.. शिरसोली) व हितेश पाटील (रा. शनिपेठ) यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलिसात पो.ना. विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून 29 जून रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात तिन्ही पोलिसांचा सहभाग आहे की नाही, याच्या तपासात अखेर चॅटींग तसेच काही तांत्रिक बाबी ज्यातून पोलिसांची गोपनिय माहिती पत्रकाराला दिल्याचे त्यातून निषन्न झाले आहे.

त्यामुळे गोपनिय माहिती देवून खंडणीतील पत्रकाराला मदत केल्याचा ठपका ठेवून प्रदीप चौधरी, शरद पाटील, दिनेश दंडगव्हाळ या तिन्ही पोलीस कर्मचा-यांना खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.

तसेच खंडणीच्या गुन्ह्यात कलम 109 वाढविण्यात आला आहे. पत्रकाराशी चॅटींग व काही तांत्रिक बाबी आढळून आल्या आहेत़ .

चौकशी करूनच पुढील कारवाई केली जाणार आहे. असल्याची माहिती, पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांनी बोलतांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या