तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांना अटक

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – Jalgaon :

शहरातील चौघुले प्लॉट येथे जुन्या वादातून तरुणाला चार ते पाच जणांनी लोखंडी पाईपसह धारदार शस्त्राने बेदम मारहाण केल्याची घटना दि.६ रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, शहरातील चौघुले प्लॉटमधील रहिवासी हितेश संतोष शिंदे (वय२०) याचे काही महिन्यांपुर्वी दीपक दत्तू चौधरी याच्यासोबत वाद झाला होता.

यावेळी दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्ती करून वाद मिटविला होता. मात्र, दि.६ डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास हितेश शिंदे हा मित्र प्रसाद चौधरी व रुपेश ठाकरे यांच्यासोबत गप्पा करीत कांचननगरातील कालिंका माता चौकात उभे होते.

यावेळी मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या सर्व रा. चौघुले प्लॉट हे तिघे त्याठिकाणी आले.

मनोजसह दोघांनी टेन्ट हाऊसमधील लोखंडी पाईप हितेशच्या डोक्यात टाकला. यात हितेश गंभीर जखमी झाला. जखमीअवस्थेत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर दीपक चौधरीने हातातील धारदार पट्टीने हितेशवर वार करून गंभीर जखमी केले.

तीन चार जणांकडून हितेशला मारहाण होत असतांनाच दत्तू चौधरीने हातात तलवार घेत याठिकाणी आला. त्याने हितेशला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

हितेशला मारहाण होत असतांना विजय शिंदे व राहुल शिंदे या दोघांनी भांडण मिटवित हितेशला रुग्णालयात दाखल केले.

शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिपेठ पोलिसात मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या, दीपक दत्तू चौधरी व दत्तू कडू चौधरी सर्व रा. चौघुले प्लॉट यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *