Type to search

रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री गोंधळ घालून पोलिसाला धक्काबुक्की

maharashtra जळगाव

रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री गोंधळ घालून पोलिसाला धक्काबुक्की

Share
जळगाव । शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ घालून एकमेकांना शिवीगाळ करणार्‍या दोघांना पोलिसांनी हटकल्यानंतर दोघांनी पोलिसाला धक्काबुक्की करून परिसरात दगड फेकल्याची घटना दि.24 च्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेंदालाल मिल परिसरातील दिपक प्रकाश भोसले, मनोहर प्रकाश भोसले हे दोघे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण करीत होते. परिसरातील नगारिकांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस दोघांना ताब्यात घेत असतांना त्यांना पोलीसांसमक्ष वाद घालून दिपक याने स्वताच्या डोक्यात दगड मारून घेत परिसरात देखील दगडे फेकली. रात्रीच दोघांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शेखर तडवी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात भादवी कलम 295, 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक्षक जगदीश मोरे करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!