Type to search

maharashtra जळगाव

मद्यपींचा हॉटेलमध्ये राडा, मॅनेजरवर हल्ला

Share
जळगाव । अजिंठा चौफुलीपासून काही अंतरावर असलेल्या त्रिमुर्ती हॉटेलच्या मॅनेजरला तिन्ही मद्यपींनी मारहारण करुन त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात हॉटेल मॅनेजरच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे.

महाबळ परिसरातील देवेंद्रनगरामधील सुरेश शांताराम आंबेकर हे त्रिमुर्ती हॉटेल येथे मॅनेजर म्हणून कामाला आहे. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास टेबल नं. 8 वर तिघे बसले होते. त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे त्यांना जेवण दिले व जेवणानंतर ते इतरांना शिविगाळ करु लागले. त्यानंतर या तिघांनी हॉटेलच्या काऊंटर व टेबलावर खाली ग्लास व बाटल्या आदळ-आपट केल्याने मॅनेजर सुरेश आंबेकर याने तिघांना बाहेर काढले याचवेळी आकाश भास्कर विश्वे रा. सुप्रिम कॉलनी, निलेश किसन चव्हाण रा. लोणवाडी व किरण धाडी या तिघांनी मॅनेजर सुरेश आंबेकर यांना अश्लिल शिविगाळ करुन मारहाण केली.

याचवेळी आकाश विश्वे याने त्याच्या खिशातून काही तरी धारदार शस्त्र काढून मॅनेजर सुरेश आंबेकर याच्या कंबरेजवळ मारुन त्याला गंभीर दुखापत केली. या प्रकरणी सुरेश आंबेकर याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होताच तिघांना अटक करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!