धानोरा येथे माथेफिरु तरुणाचे दुष्कृत्य बहिण-भावाला विहिरीत फेकले?

0
धानोरा । वार्ताहर- येथे मुस्लिम वाड्यातील चिमुकल्या बहिण व भावाला एका माथेफिरुने केळीच्या शेतात नेऊन दुष्कर्म करुन जवळच असलेल्या शेतातील विहरीत फेकून दिल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच स.पो.नि.राहुल पाटील व डीवाय.एस.पी.सौरभ अग्रवाल यांनी सबंधीतस्थळी भेट दिली. यावेळी शेकडो ग्रामस्थांसह परिसरातील डझनभर विहिरी पोलिसांनी पिंजून काढल्या.रात्री 12 वाजता घटनास्थळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना दिल्या.

मुस्लिम वाड्यातील चिमुकल्या बहिण व भावाला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथीलच रहिवासी खालीद शेख ईस्माईल (वय 28) या माथेफिरुने खाऊ देण्याच्या अमिषाने गल्लीतीलच तनविर शेख महेबूब (वय 6) व निसमाशेख (वय 7) घरुन नेले, मात्र तो माथेफिरु घरी परतूनही सबंधीत चिमुकले बहिण-भाऊ घरी न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध केरुनही ते सापडून न आल्याने शेवटी पोलीस पाटील दिनेश पाटील यांना कळविले.

पोलीस पाटील यांनी सबंधीत व्यक्तीला विश्वासात घेत माहिती काढली असता माथेफिरु खालीद शेख ईस्माईल याने त्या चिमुकल्या बहिण-भावाला बिडगाव रोडलगत धानोरा शिवारातील एका विहिरीत फेकल्याची माहिती देत सबंधीत विहीरही दाखविली सदरील घटनेने धक्काच बसत ही माहिती पोलीस पाटलांनी अडावद पोलिसांना दिली असता, स.पो.नि.राहुल पाटील आपल्या ताफ्यासह गावात येत संशयीत खालीद शेखला ताब्यात घेतले व त्याने माहिती दिलेल्या विहिरीकडे धाव घेतली.

यावेळी शेकडो ग्रामस्थही उपस्थित होते. या विहिरीत शोध घेऊनही काही न मिळाल्याने घटनास्थळी आलेले डीवाय.एस.पी.सौरभ अग्रवाल यांच्या उपस्थितीत डझनभर विहिरी यावेळी पोलिसांनी पिंजून काढल्या यात मात्र हाती काहीही लागले नसले तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रात्री उशिरा 12 वाजेनंतरही पोलिसांकडून परिसरातील विहिरींवर शोधकार्य जोरात सुरु होते.

LEAVE A REPLY

*