जळके येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा

0
जळगाव । तालुक्यातील जळके गावी एका 23 वर्षीय तरूणाला आमच्या वाड्यातील मुलींकडे का पाहतो या कारणावरून गावातील पाच ते सहा जणांनी त्याला लोखंडी रॉड, सळईने पोटावर मारहाण केल्याची घटना दि.10 रोजी घडली होती.

या तरुणावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज मयत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील जळके येथील रहिवाशी असलेला राजु देवराम सुरवाडे (वय-23) या तरूणाने गावातील एका तरुणास मारहाण करून जखमी केले होते. या भांडणातून तसेच तु आमच्या वाड्यातील मुलींकडे पाहिले तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून आबा अर्जून सोनवणे, सुपडू रामकोर सोनवणे रा. दोघे जळके व देवा धनराज भिल रा. विटनेर या तिघांनी दि. 10 रोजी रात्री गावातील हनुमान मंदिर चौकात राजुला लोखंडी रॉड,

सळईने पोटावर मारहाण केली होती. या मारहाणीत तो जखमी झाला होता. त्या दिवसांपासून राजुवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. दि.11 रोजी दुपारी 3.30 वाजता उपचारादरम्यान राजुचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज राजुचे वडील देवराम सखाराम सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून आबा अर्जून सोनवणे, सुपडू रामकोर सोनवणे रा. जळके व देवा धनराज भिल रा. विटनेर या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित आबा सोनवणे व सुपडू सोनवणे या दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय योगेश शिंदे करीत आहे.

LEAVE A REPLY

*