वाळू वाहतूक करणारे तीन डंपर आरटीओच्या पथकाने पडकले

0
जळगाव । जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशनानंतर आरटीओच्या भरारी पथकाने वाळू वाहतूक करणारे तीन डंपर शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास रेमंड चौफुली ते अंजिठा चौकादरम्यान पकडले. या तिन्ही वाहनांविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासन निवडणुका, आचारसंहितांच्या कामात व्यस्थ असतानाच सर्रासपणे वाळू वाहतूक होत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील केवळ 5 वाळू गटांचे लिलाव झाले असून 7 गटांचे लवकरच लिलाव होणार आहे. लिलावात सहभागी न होता, अवैधरित्या वाळू वाहतूक सध्या सुरु आहे. जिल्हाधिकार्‍यांनी वाळू वाहतूक करणार्‍यावर तीव्र स्वरुपाची कारवाईचे निर्देश दिले होते.त्यानुषंगाने आरटीओच्या भरारी पथकातील मोटारवाहन निरीक्षक सुनिल देशमुख, विलास चौधरी, सहाय्यक निरीक्षक उमेश तायडे, रणजित पाटील यांच्यासह पथकाने रेमंड चौफुली ते अंजिठा चौफुलीदरम्यान एमएच 04 इबी 6461, एमएच 19 सीवाय 1958, एमएच-19- 3904 या तीन डंपर कारवाई केली. या तिन्ही वाहनांकडून वाहतूकीच्या पावत्या आढळून आल्या असून या तिन्ही डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू असल्याने या वाहनांविरुध्द सार्वजनिक मालमत्ताहानी प्रतिबंधक कायदा कलम प्रमाणे एमआयडीसी पोलीस गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लिलावात सहभागी न होता अवैधरित्या वाळू वाहतूक
बरेचशे वाळूमाफिया लिलावात सहभागी न होता, अवेधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील 5 वाळूगटाचे लिलाव झाले असून 7 गटांचे अद्याप लिलाव झालेले नाही. त्यामुळे सर्रासपणे वाळू वाहतूक सुरु आहे. त्यातच निवडणुका व आचारसंहितेमध्ये अधिकारी व्यस्थ असल्याने वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक करीत आहे.

LEAVE A REPLY

*