अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास अटक

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करणार्‍या संशयीतास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची दि.27 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील राहुल विजय चौधरी(वाघ) या तरुणाने रामेश्वर कॉलनीतील एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते.
ही घटना दि.19 रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पीडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयीताचा शोधासाठी सपोनि समाधान पाटील यांच्या पथकाने बुलढाणा परिसरात गेले. दरम्यान संशयीत राहुल चौधरी याला पोलीसांनी मुलीसह ताब्यात घेतले.

मुलीने नातेवाईकांकडे जाण्यास नकार दिल्याने तिला सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले. दरम्यान अल्पवयीन असल्याचे माहित असतांना लग्नाचे आमिष दाखवुन मुलीवर अत्याचार केल्याचे तपासदरम्यान निष्पीन्न झाले.

त्यामुळे वाघ याच्यावर भादंवि कलम 376 नुसार अतिरीक्त कलम लावण्यात आले. चौधरी याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

न्या.अग्रवाल यांच्या न्यायालयाने त्याची दि.27 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*