Type to search

जळगाव

भजे गल्लीत हॉटेल बाहेर क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी

Share

जळगाव । शहरातील भजे गल्लीजवळील हॉटेल बाहेर क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5.30 सुमारास घडली. या हाणामारी कपिल दिलीप बागडे वय 29 रा. कंजरवाडा, मोहनसिंग बावरी वय 21 रा. शिरसोली नाका हे दोघे जखमी झाले आहे.

याबाबत जखमी कपिल यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, कपिल हा बागडे हा भजे गल्लीतील एका हॉटेलमध्ये बसला हो. त्याठिकाणी मोहनसिंग बावरी यांच्यासह दोघे आले. कपिल याने मायकल आला नाही का असे विचारले असता, कपिल व मोहनसिंग यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोघांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कपिल याच्या गळ्यातील सोन्याची चैन बावरी याने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू चैन कपिल याच्याजवळ खाली पडली. त्यानंतर मारहाण करणार्‍या दोघांनी याठिकाणावरून पळ काढला. मोहनसिंग बावरी हा त्याच्या भावांसह जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला. याचवेळी कपिल देखील रुग्णालयात दाखल झाला.

जिल्हा रुग्णालयात गोंधळ
जखमी दोघांसह नातेवाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे रुग्णलयात जवळपास अर्धातास गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती कळताच जिल्हापेठ पोलीसांनी याठिकाणी धाव घेेतली. त्यानंतर गोंधळ मिटला.

अवैध देशी दारुच्या विषयावरून वाद
कंजरवाड्यातून बाहेर विकली जाणारी दारु पुरविण्याचे काम बावरी कुटुंबिय करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बावरी स्वतंत्र्य देशी दारुच्या व्यवसायाची लाईन लावत असल्याने बागडे यांना कळाले. दरम्यान या कारणावरून बागडे यांनी हॉटेलच्या बाहेर मोहनसिंग बावरी याला मारहाण केली. त्यानंतर मोहनसिंग याने घरी जावून हा प्रकार त्याच्या भावांना सांगितला. काहीवेळात मोहनसिंगसह त्याच्या भावांनी कंजरवाड्यात जावून कपिल बागडे याला बेदम मारहाण केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!