Type to search

जळगाव

कुसुंब्यात दोन गटात जोरदार हाणामारी; परस्परांविरुध्द दंगलीचे गुन्हे दाखल

Share

जळगाव । तालुक्यातील कुसंबा गावी तु माफीचा साक्षीदार का होता या कारणावरून दोन गटात जोरदार वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली. या हाणामारीत तलवार, कोयत्यासह लाकडी लाठ्या काठयाचा वापर करण्यात आला असून चौघे जखमी झाले. या हाणामारीमध्ये पानटपरी व हॉटेलचे नुकसान झाले असून ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास गावातील बसस्टॅण्डजवळ घडली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीसात जखमी दोघांच्या जबाबावरून परस्पराविरुध्द प्राणघातक हल्ल्यासह दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सायंकाळी डिवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांनी भेट घेवून तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तू माफीचा साक्षीदार का होता या कारणावरून प्रविण शांताराम कोळी, रविंद्र शांताराम कोळी, विशाल शांताराम कोळी, विजु पूर्ण नाव माहित नाही, शांताराम कोळी पूर्ण नाव माहिती नाही रा. सर्व कुसुंबा यांनी श्रावण शेनफडू कोळी यांच्याशी वाद घातला. या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून या पाचही जणांनी श्रावण कोळी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रविण कोळी याने श्रावण कोळी यांच्यावर तलवारीने वार केले. त्यामुळे श्रावण कोळी यांच्या कानाच्या खालील बाजुला दुखापत झाली आहे. तसेच शांताराम कोळी याने लोखंडी रॉडने तर इतरांनी लाठा काठ्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याला जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी श्रावण कोळी यांच्या जबाबावरून प्रविण शांताराम कोळी, रविंद्र शांताराम कोळी, विशाल शांताराम कोळी, विजु पूर्ण नाव माहित नाही, शांताराम कोळी पूर्ण नाव माहिती नाही रा. सर्व कुसुंबा या पाच जणांविरुध्द भादवी कलम 307 ,143, 147,148, 149, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या गुन्ह्यात तुझ्या भावाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बसस्टॅण्डजवळील हॉटेलचालक रविंद्र शांताराम बाविस्कर याला श्रावण शेनफडू कोळी, हिम्मत पाटील, पंडीत कोळी, योगेश कोळी, गोलू कोळी,गणेश कोळी, भावलाल पाटील, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, चेतन पाटील, निलेश पाटील, जगन्नाथ कोळी, राजु कोळी रा. सर्व मराठी शाळेजवळ कुसुंबा यांनी लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्याच्या हॉटेलवर दगडफेक केली. यात हॉटेलचे नुकसान झाले असून त्याच्या दुकानाच्या गल्ल्यातील 7 हजार रुपये कोणीतरी जबरीने लुटून नेले. या मारहाणीत रविंद्र बाविस्कर यांच्यासह वडील व भाऊ प्रविण हे तिघे जखमी झाले आहे. जखमी रविंद्र याच्या जबाबावरून श्रावण शेनफडू कोळी, हिम्मत पाटील, पंडीत कोळी, योगेश कोळी, गोलू कोळी,गणेश कोळी, भावलाल पाटील, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, चेतन पाटील, निलेश पाटील, जगन्नाथ कोळी, राजु कोळी रा. सर्व मराठी शाळेजवळ कुसुंबा या 13 जणांविरुध्द भादवी कलम 397, 307, 143, 147, 148 ,149 ,324, 337, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सिध्देश डापकर करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!