Type to search

जळगाव

वायरचे बंडल चोरणार्‍या महिलांसह रिक्षाचालक अटकेत

Share

जळगाव | महावितरणच्या गाळण विभागाच्या मोकळ्या जागेतून ८० हजार रुपयांचे वायरचे बंडल चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी चार महिलांसह रिक्षाचालकाला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व वायरचे दोन बंडल संशयितांकडून हस्तगत केले आहे. संशयित चारही महिला व रिक्षाचालकाला न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि.२५ पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

गाळण विभागाच्या मोकळया जागेतून ८१ हजार रुपयांचे ३९ वायर बंडल दि.१८ जुलैच्या पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरु होता. दरम्यान पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांंना मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शोध पथकातील कर्मचारी आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, सचिन मुंडे, अतुल पाटील, सचिन पाटील, चालक मिलींद पाटील यांनी सापळा रचून सिमा मजहर कुरेशी वय २८, शोभा मुकेश पवार वय ३५, रजिया जाकीर शहा वय २५, नुरी नबा पटेल वय ३१ रा. सर्व लक्ष्मीनगर आव्हाणे रोड तसेच रिक्षाचालक मोहम्मद अली आबेदअली वय ५६ रा. गेंदालाल मिल या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वायरचे दोन बंडल मिळून आले असून रिक्षाचालक मोहम्मद अली याची एमएच १९, व्ही ०३१८ क्रमांकाची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. संशयित या चारही महिलांसह रिक्षाचालकाला न्यायाधीश जैन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना दि.२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सरकारपक्षातर्फे ऍड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!