Type to search

maharashtra जळगाव

अयोध्यानगरात तरुणावर चाकू हल्ला

Share
जळगाव । शहरातील अयोध्यानगरातील किराणा दुकानाजवळ किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून मित्रानेच मित्रावर चाकू हल्ला केल्याची घटना आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या जखमी तरुणाला लागलीच इतर मित्रांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

किरण अशोक पाटील वय 24 रा. अयोध्यानगर हा व त्याचा मित्र अयोध्या नगरातील किरणा दुकानाजवळ गप्पा मारत उभे होते. याचवेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झाले. या भांडणातून किरण पाटील याच्या पाठीजवळ त्याच्याच मित्राने चाकू मारून पळ काढला. या घटनेप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

रेल्वे पटरीजवळील चाकू हल्ल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा
शिवाजीनगरातील स्मशानभुमीजवळील रेल्वे पटरीवर नारायण राजू गवळी वय 29 रा. चौघुले प्लॉट हा दि.18 रोजी रात्री 9.30 वाजता मोबाईलवर बोलत असतांना अज्जू व पट्टया (पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांमागे काही तरुण पळत असतांना नारायण याने या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अज्जू याने त्याच्याजवळील चाकू काढून नारायण राजू गवळी याच्या बरगडीजवळ मारून त्याला जखमी केले होते. जखमी नारायण याच्यावरउपचार सुरु होते. याप्रकरणी गुरुवारी रात्री जखमी नारायण गवळी याच्या फिर्यादीवरून अज्जू व पट्टया (पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांविरुध्द भादवी कलम 307, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!