Type to search

जळगाव

हिंजेवाडी दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या

Share

जळगाव । पुणे येथील हिंजेवाडी परिसरातील पेट्रोलपंपावरील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयिताच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व 5 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. संशयिताविरुध्द गुन्हा नोंदविण्यात येवून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

हिंजेवाडी परिसरातील पेट्रोलपंपावर दोन दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्याच्या गुन्ह्यात चार संशयितांना अटक केली आहे. तर दोन संशयित पळून गेले होते. यातील एक संशयित जळगावातील एमआयडीसी परिसरातील असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्याने, त्यांनी एमआयडीसी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना तात्काळ संशयितांच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस कर्मचारी विजय पाटील यांना संशयित रामेश्वर शेषमल राठोड वय 25 रा. आयटीआय कॉलनी, जामनेर हा एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील टायटन कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुषांगाने पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, सफौ. अतुल वंजारी, विजय पाटील, मनोज सुरवाडे, अशोक सनगत, असिम तडवी, मुदस्सर काझी, प्रविण मांडोळे यांनी सापळा रचून संशयित रामेश्वर राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!