Type to search

जळगाव

मयूर कॉलनीतील 14 वर्षीय बालकाचे अपहरण

Share

जळगाव । शहरातील मयूर कॉलनीतील 14 वर्षीय बालक जयेश अशोक राजपूत हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याचे कोणीतरी अपहरण केले असल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविल्याने रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

जयेश राजपूत हा बालमोहन शाळेत इयत्ता 9 वीमध्ये शिकत होता. आठ दिवसांपूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबियांनी शाळेतील त्याच्या मित्रांना देखील विचारपूस केली परंतु तो मिळून न आल्याने बुधवारी दुपारी त्याचे वडील अशोक राजपूत यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या बालकाबाबत माहिती मिळाल्यास रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!