Type to search

जळगाव

लुटमारीच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात कोसळला

Share

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळील हॉटेलजवळ लुटमारीच्या उद्देशाने अज्ञात 4 ते 5 जणांनी ट्रकचालकासह क्लिनरला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीमध्ये झालेल्या झटापटीमध्ये ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला नाल्यात कोसळला. त्यामुळे चालक व क्लिनर याच्यासह मारहाण करणार्‍या टोळीत एकाला दुखापत झाली. जखमी क्लिनर रामदास ओंकार भिल वय 41 व चालक रामरतन सुरेश शिरसाठ वय 30 रा. दोघे हातेड ता. चोपडा या दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याबाबत प्रत्यक्ष जखमींकडून मिळालेली माहिती अशी की, शिरपूर येथील पिंटू जैन याचे महावीर रोडलाईनचा एमएच 18 एए 9634 क्रमांकाच्या ट्रकवर रामरतन सुरेश शिरसाठ हा चालक म्हणून तर रामदास ओंकार भिल हा क्लिनर म्हणून कामाला आहे. दरम्यान, खामगाव येथे माल उतरविल्यानंतर हा ट्रक पुन्हा शिरपूरकडे जाण्यास निघाला. त्यानंतर खेडी गावाजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या चार ते पाच अज्ञातांनी ट्रकच्या पुढे मोटारसायकल उभी केली. त्यातील एका तरुणाने ट्रकच्या कॅबीनमध्ये चढून क्लिनर रामदास भिल याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसर्‍या युवकाने ड्राईव्हरच्या बाजूच्या काचेवर दगडफेक केली. याचवेळी ट्रकचालक रामरतन शिरसाठ याने ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकमध्ये घुसलेल्या युवकाने चालकाच्या हातावर चावा घेतला.

चालत्या ट्रकमध्ये चालकासोबत त्या दोघांची झटापट
8 ट्रकमध्ये घुसलेल्या दोघांनी ट्रकचालकासह क्लिनरला बेदम मारहाण केली. या मारहाणीवेळी झालेल्या झटापटीमध्ये ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावरील खेडी गावाजवळ असलेल्या नाल्यात कोसळला. त्यामुळे ट्रकचालक रामरतन शिरसाठ व क्लिनर रामदास भिल हे दोघे गंभीर जखमी झाले.

मारहाण करणारा तरुण घटनास्थळावरुन फरार
8 ट्रकच्या कॅबीनमध्ये सुरु असलेल्या झटापटीमध्ये ट्रक नाल्यात कोसळला. यावेळी ट्रकमध्ये लुटमारीच्या उद्देशाने मारहाणीत करीत असलेला एक तरुण देखील ट्रकमध्येच होता. त्याला देखील दुखापत झाली. त्याच्यासोबत असलेल्या इतर सहकार्‍यांनी त्याला तात्काळ याठिकाणावरून उचलून नेले. याबाबत पोलिसांत कुठलीही नोंद नाही.

ट्रकचालकांना मारहाण करून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
8 मागील दीड महिन्यांपूर्वी शहरातील शिवकॉलनी पुलाजवळ ट्रकवर दगडफेक करून ट्रकचालकाला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. ट्रकचालकाने वेळीच प्रसंगावधाने ट्रक रस्त्याच्याकडेला उतरविला होता. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर देखील रस्ता लुटीच्या घटना वाढत आहे. यामुळे ट्रकचालक त्रस्त झाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!