चोरट्याकडून चार हजारांचा ऐवज जप्त

0
भुसावळ । येथील शिव कॉलनी भागाती बांधकाच्या ठिकाणावनरु टाईल्स कटींग मशीन व ग्रांईडर मशीन चोरी करणार्‍या आरोपीला 4 हयार रुपयांच्या साहित्यासह अटक केल्याची कारवाई बाजार पेठ पोलिसांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार येथील श्रीनगरातील रहिवासी अहमद खान नकीर अली (वय 22) यांचे शहरातील जामनेर रोड वरील शिव कॉलनी थागातील रहिवासी मनोज चौधरी यांच्या घराच्या टाईल्स फिटींगचे काम सुरु असल्याने अहमद यांनी टाईल्स कटींग मशीन 1500 व व ग्रांईडर मशीन 2500 असे 4 हजार रुपयांचे साहित्य कामाच्याच ठिकाणी ठेवले होते. हे साहित्य दि 13 जून रोजी चोरी झाल्याचे अहमद खान यांच्या लक्षात आले.

याबाबत बाजार पेठ पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपीचा शोध सुरु होता. आरोपी साबीरशहा शब्बीरशहा (वय 24, रा.मदीनानगर जामनेर) हा येथील पंचशील नगरात आल्याच्या गुप्त माहीतीच्या आधारे सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल,

पो.नि. चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ युवराज नागरुत, पो.ना.सुनिल थोरात, कृष्णा देशमुख, नरेंद्र चौधरी, पो.काँ. नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण,

उमाकांत पाटील, राहुल चौधरी, योगेश माळी यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने एक ग्राईंडर मशीन, टाईल्स कापण्याचे मशीन असा 4 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. त्यास अटक करण्यात आली असून तपास पो.हे.काँ युवराज नागरुत करीत आहेत.

LEAVE A REPLY

*