Type to search

जळगाव

गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय

Share

रावेर । निंबोल(ता.रावेर) येथील विजया बँकच्या सहा.बँक व्यवस्थापकावर मंगळवारी गोळी झाडून केलेल्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणा कसून तपासाला लागली आहे.बुधवारी सकाळी 9 वाजेला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.यावेळी 17 तासापेक्षा जास्त वेळ उलटूनही काही सुगावे लागत नसल्याने तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी दुपारी अडीच वाजता बँकेत झालेल्या गोळीबाराने सहाय्यक शाखा व्यवस्थापक किरणसिंग नेगे यांच्या छातील गोळी घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.बुधवारी सकाळीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी निंबोल गाठले,यावेळी त्यांनी बँकेचे सी.सी.टी.व्ही.फुटेजची तपासणी केली.प्रत्यक्षदर्शी असणार्‍या कर्मचार्‍यांकडून घटनेबाबत माहिती जाणून घेतली,बँक परिसराची टेहाळणी करत,तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नाराजी देखील व्यक्त केली.निंबोल येथून त्यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांची भेट घेतली.रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या करणसिंग यांच्या मृतदेहाची पाहणी करून,त्यांच्या शरीरात असलेली गोळी शोधण्यासाठी पुन्हा क्ष किरण काढण्याचे डॉ.बारेला यांना सांगितल्यानंतर सुधारित क्ष किरणाच्या अहवालात गोळी दिसून आली.या नंतर श्री.दोरजे यांनी पुन्हा विजया बँकेत जाऊन अधिकार्‍यांना तपासासंबंधी सूचना देऊन,नाशिककडे रवाना झाले.दरम्यान रावेर ग्रामीण रुग्णालयात करणसिंग नेगे यांचे शवविच्छेदन डॉ.बी.बी.बारेला यांनी केले.यात छातीवर उजव्या बाजूने गोळी आता घुसल्याने उजव्या बाजूचे व डाव्या बाजूच्या फुफुसाला इजा करून बरगडी तोडल्याचे स्पष्ट होऊन गोळी पाठीच्या डाव्या बाजूच्या मासांत अडकलेली मिळून आली.यानंतर करणसिंग नेगे यांचा मृतदेह कार्डियाग रुग्णवाहिकेने मुंबई कडे रवाना केला असून,गुरुवारी सकाळी हा मृतदेह विमानाने शिमला येथे नेण्यात येणार आहे.त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय देखील मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येणार असल्याचे बँक अधिकार्‍यांनी सांगितले.

घटनेचा चौफेर तपास
दरोड्याच्या घटनेचा सर्व बाजुंनी सखोल तपास सुरु आहे. वेगवेगळे आठ पथक तपासासाठी रवाना झालेली आहे. अद्याप कुठलाही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. बँकेत त्या दिवशी दिवसभर आलेल्यांचे तसेच परिसरातील अनेक ठिकाणचे फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.
– बापू रोहोम,
पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!