Type to search

जळगाव

…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Share

जळगाव । नोटाबंदीच्या काळात ग.स.सोसायटीच्या बळीरामपेठ शाखेत तत्कालीन अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांनी किरण भिमराव पाटील यांच्या नावाने बनावट खाते उघडून त्यात 50 लाख रुपये परस्पर बनावट स्वाक्षरी करून ठेवले होते. त्यानंतर परस्पर ही रक्कम काढून देखील घेण्यात आली होती. या अपहाराप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष, बनावट खातेदार किरण पाटील यांच्यासह सर्व संचालकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावे अशी याचिका रावसाहेब मांगो पाटील यांनी दाखल केली होती. या यचिकेवर निर्णय होवून शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून असंपदेप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष सुनिल अभिमान सुर्यवंशी व सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचा मुलगा किरण पाटील यांच्याविरुध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

जिल्हा परिषदेत कक्षाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनिल अभिमन सुर्यवंशी हे सन 2016 मध्ये ग.स.सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याच काळात नोटाबंदी झाल्याने सुर्यवंशी यांच्यासह बी.बी.पाटील यांचे मुलगा किरण भिमराव पाटील यांनी आपसात संगनमत करून ग.स.सोसायटीच्या बळीरामपेठ शाखेत किरण पाटील यांचे नावे नाममात्र बचत ठेव जमा पावतीवर बनावट सही करून नाममात्र बचत ठेव खाते पावतीवर बचत ठेव ठेवण्यासाठी सही करून सदरचे बचत ठेव खाते बचावतट असल्याचे माहिती असूनही अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांनी बेहिशोबी 50 लाख रुपयांची रक्कम अष्टचक्र ठेव योजनेत गुंतविली होती. त्यानंतर ही रक्कम काढण्यासाठी दि.19 सष्टेंबर 2016 रोजी नाममात्र बचत ठेव खाते पावतीवर रक्कम काढण्यासाठी बनावट सही करून धनादेशदेय रजिस्टर व धनादेश मिळाल्याची बनावट स्वाक्षरी करून 51 लाख 78 हजार 887 रुपये व्याजासह काढले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रावसाहेर पाटील यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. गुन्हा दाखल करण्याचे आदेश होताच असंपदाप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष सुनिल अभिमान सुर्यवंशी व सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचा मुलगा किरण पाटील यांच्याविरुध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल सुर्यवंशी व किरण पाटील या दोघांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.

कोण आहेत सुनिल सुर्यवंशी व किरण पाटील
नोटाबंदीच्या काळात लाखो रुपयांच्या पैश्यांची फेरफार केल्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने सुनिल सुर्यवंशी यांची चौकशी केली होती. त्यावेळी सुनिल सुर्यवंशी हे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कक्षाधिकारी होते. तसेच सन 2016 मध्ये सुनिल सुर्यंवशी हे ग.स.सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर किरण भिमराव पाटील हे सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचे पुत्र आहे. ग.स.सोसायटीमध्ये विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!