Type to search

जळगाव

कैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा

Share

जळगाव । पोलीस बंदोबस्तात न्यायालयात तारखेवर आलेल्या कारागृह कैद्यांनी पोलीस सोबत असतांना हॉटेलमध्ये जावून मद्यप्राशन केले. त्यानंतर घरी जावून त्यांनी एका तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात कारागृहातील दोन्ही कैदी व एका पोलीस कर्मचार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कैद्यांसोबत पोलीस बंदोबस्तात असलेल्या तीन पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात येणार आहे.

खूनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या व गोलू उर्फ लखन दिलीप मराठे हे गुरुवारी सकाळी 10.40 वाजता न्यायालयीन तारखेवर हजर राहण्यासाठी कारागृहातून पोलीस बंदोबस्तासह बाहेर पडले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व गोरख पाटील हे तिन्ही कर्मचारी सोबत होते. सायंकाळी 5.45 वाजेनंतर न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर दोन्ही कैद्यांनी त्यांच्या मित्राची कार न्यायालयाजवळ बोलविली. पोलीस कर्मचारी सुरेश सपकाळे व गोरख पाटील हे मोटारसायकलीवर होते तर पोलीस कर्मचारी मुकेश पाटील हा कैद्यासोबत त्यांच्या कारमध्ये बसला होता. त्यानंतर दोन्ही कैदी व पोलीस कर्मचार्‍याने शहरातील एका हॉटेलमध्ये यथेच्छ दारु प्राशन केली. त्यानंतर त्यांनी तुकारामवाडीत जावून अरुण गोसावी याला मारहाण केली.

गोसावीला त्यांच्या कारमध्ये बसवून कारागृहाकडे नेवून सोडले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अरुण गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्या पथकाने मुख्यालयाच्या तिन्ही पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी सुरु केली आहे. चौकशीनंतर त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!