कुर्‍हाळदे शिवारातील खदानीत आढळला युवकाचा मृतदेह

0
जळगाव । तालुक्यातील कुर्‍हाळदे शिवारातील खदानीत मतय स्थितीत 38 वर्षीय युवकाचा मृतदेह आज दुपारी आढळून आला. मृतदेह बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यता आली आहे. समाधान बाबुलाल पाटील रा. कुर्‍हाळदे असे मयताचे नाव आहे.

कुर्‍हाळदे येथील समाधान बाबुलाल पाटील हे ट्रकचालक आहे. दुपारी 2.30 वाजता मेंढपाळ बकर्‍या चारण्यासाठी गेला असता, त्याला खदानीत समाधान याचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान त्याच्या तोंडातून फेस निघत होता. याबाबत मेंढपाळाने लागलीच गावातील नागरिक व पोलिस पाटील सुरेळ न्हाळदे यांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली,भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*