Type to search

जळगाव

गोलाणी मार्केट येथे मोबाईल सट्टा घेणार्‍या दोघांना अटक

Share

जळगाव । शहरातील गोलाणी मार्केट परिसरात मोबाईल सट्टा घेण्यार्‍या पानटपरी व्यवसायिकासह एकाला डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्याच्याकडून रोख रकमेसह,2 मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

गोलाणी मार्केटच्या रगड्याच्या दुकानाजवळील विंगच्या बाहेर पानटपरी वाल्याकडून सट्टा घेतला जात असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. रोहन यांना मिळाली. त्यानुषंगाने डॉ. रोहन व पथकाने याठिकाणी धाड टाकून सुरेश गवळी व बंटी गवळी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 हजार 190 रुपये रोख, 7 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल व 30 हजार रुपयांची मोटारसायकल असा एकून 42 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!