Type to search

प्रेम विवाहानंतर परतलेल्या दाम्पत्यास मारहाण

maharashtra जळगाव

प्रेम विवाहानंतर परतलेल्या दाम्पत्यास मारहाण

Share
भुसावळ । येथील जामनेर रोडवरील कृष्णा नगरातील रहिवासी युवतीने अंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना दि. 19 रोजी घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात माहेरच्या तब्बल 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिलांसह आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बाजारपेप पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोना नितीन कांडेलकर (रा. कृष्णा नगर, भुसावळ) या तरुणीने कृष्णा नगरातील रहिवासी नितीन मधुकर कांडेलकर यांच्याशी दि. 21 ऑक्टोबर 2018 रोजी येथील न्यायालयात रजिस्टर विवाह केला आहे. तेव्हापासून ती पती सोबत बाहेरगावी राहत होती. तीला नितीन कांडेलकर यांचेपासून आठ महिन्याचे गर्भवती असल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. मोना ही पतीसह दि.18 मे रोजी भुसावळ येथे आली.ही माहिती तीच्या नातेवाईकांना मिळाली.त्यामुळे आरोपी नवलसिंग मंजुसिंग भाडिया (रा.हरदा, मध्यप्रदेश), दीपसिंग बावरा, बाबुसिंग बावरा, प्रतापसिंग दरबारसिंग बाटीया, मंगलसिंग छाबडा, अवतारसिंग बाटीया, चंदनकौर मंगलहसिंग छाबडा,छायाकौर प्रधानसिंग बावरा, कुलजितसिंग बावरा, मोनुसिंग बावरा, जतेसिंग बावरा, प्रधानसिंग चंदनसिंग बावरा व बलजितसिंग बावरा (सर्व रा. भुसावळ) यांनी दि.19 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन तीला शिवीगाळ व मारहाण केली. ती गर्भवती असतांनाही तीच्या पोटात लाथ मारली. ही माहिती पती नितीन कांडेलक व दीर व सासू यांना मिळताच ते घरी आले. त्यावेळी आरोपींनी यांनाही मारहाण केली. यासंदर्भात बाजारपेठ पोलिसात गु.र.नं.286/19, भा.दं.वि.307, 353, 143, 147, 148, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. तपास एपीआय सारिका खैरनार करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!