Type to search

maharashtra जळगाव

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर प्राणघातक हल्ला

Share
चाळीसगाव । तालुक्यातील वाघडू येथे चारित्र्याच्या संशयाने पछाडलेल्या पतीने अंगणात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.18 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेने वाघडू गावात एकच खळबळ उडाली आहे.

वाघडू येथील भिकन भाऊराव पवार (वय 55) हा पत्नी व तीन मुलींसह राहातो. तो नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे पत्नी आपल्याला सोडून जाईल या भितीपोटी रागातुन त्याने दि.18 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास पत्नी व मुली अंगणात झोपलेल्या असतांना पत्नी अन्नपूर्णा भिकन पवार (वय 50) यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यात कुर्‍हाडीचा घाव बसताच अन्नपुर्णाबाई यांनी एकच किंकाळी फोडली. या हल्ल्यानंतर भिकन पवार हा पळून गेला तर गंभीर जखमी झालेल्या अन्नपुर्णाबाई पवार यांना गावातील लोकांनी तातडीने शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र डोक्यात कुर्‍हाडीचा घाव अधिक बसल्याने अन्नपूर्णाबाई यांना तात्काळ धुळे येथे हिरे मेडीकल महाविद्यालयात दाखल केले आहे. याप्रकरणी वाघडुचे पोलीस पाटील गणेश प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिकन पवार यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं.169/2019 भादंवि कलम 307,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे हे करीत आहेत.

पतीने दिले गुन्हांची कबूली-
आरोपी भिकन पवार याने गावाचे पोलीस पाटील यांच्याजवळ पत्नी दुसर्‍या सोबत पळून जावू शकते याकारणावरुन तिच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!