Type to search

बँकेसह 13 जणांची 14 लाखांत फसवणूक

maharashtra जळगाव

बँकेसह 13 जणांची 14 लाखांत फसवणूक

Share
भुसावळ । येथील इंडसइंड बँकेच्या 13 ग्राहकांकडून पैसे घेवून बँकेत भरणा न करता 14 लाख 36हजार 400 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील इंडसइंड बॅक शाखेकडून 13 जणांनी वाहन कर्ज घेण्यासाठी वसिम हमीद शेख (वय 33, रा. काजी प्लॉट भुसावळ), कुणाल प्रकाश अहिरे (वय 34, रा. समता नगर, भुसावळ) यांनी वाहनासाठीचे डाऊन पेमेंटचे 6 लाख 4 हजार रुपये घेऊन या रक्कमेतून 2 लाख 87 हजार 465 रुपए बँकेत डाऊन पेमेंट म्हणून भरणा केला. व ग्राहकांकडून घेतलेल्या दस्तऐवजांवर खोट्या सह्या करुन इंडसइंड बँक भुसावळ शाखेकडून 8लाख 32 हजार 400 रुपयांचे वाहन कर्ज मंजुर करुन घेउन ग्राहकांकडून घेतलेली रक्कम बँकेकडे जमा न करता ग्राहकांनी त्यांच्याकडे सोपविलेल्या रक्कमेचा अपहार करुन इंडसइंड बँक भुसावळ व 13 जणांची 14 लाख 36 हजार 400 रुपयात फसवणूक केली. याबाबत बँकेचे चौकशी करुन आरोपींनी अपहार केल्याचे लक्षात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत इंडसइंड बँकेचे विधी अधिकारी चंद्रकांत अशोक चौधरी (वय 35, रा. विठोबा नगर, कालींका मात मंदीराजवळ,जळगाव) यांच्या फिर्यादी वरुन शहर पोलिसात आरोपी वसिम हमीद शेख, कुणाल प्रकाश अहिरे यांच्या विरुद्ध गु.र.नं. 112/19, भा.दं.वि. 420, 408, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास डिवायएपी गजानन राठोड, पो.नि. बाळासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. मोहम्मद अली सैय्यद करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!