Type to search

उधारीच्या पैश्यांच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

maharashtra जळगाव

उधारीच्या पैश्यांच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Share
जळगाव । उधारीचे पैसे घेण्याच्या वादातून तिघांनी राहुल मधुकर शिंदे वय 24 रा. योगेश्वर नगर यांच्या अंगावर मिरची पुड टाकून अतिशय कु्ररपणे बेदम मारहाण केल्याची घटना दुपारी 3.30वाजेच्या सुमारास गोपाळपुरा परिसरातील खळ्यात घडली. जखमी तरुणावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

राहुल याने दोन दिवसांपासून इच्छादेवी चौकात अंडापाव विक्रीची गाडी सुरु केली आहे. त्यासाठी त्याने एका विक्की नामक तरुणाकडून 16 हजार रुपये उधारीने घेतले होते. त्यातील 10 हजार रुपये राहुल याने परत देखील केले होते. उर्वरित 6 हजार रुपयांसाठी विक्की नामक तरुण राहुलकडे तगादा लावत होता. त्यानुसार विक्की याने राहुलला दुपारी फोन करून काशीबाई उखाजी कोल्हे शाळेजवळ बोलविले होते.

त्यानंतर विक्की व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी राहुल याला गोपाळपुर्‍यातील खळ्यात नेले. त्यानंतर विक्की याने मिरची पुड आणून राहुल याच्या अंगावर टाकली तसेच दोघांनी राहुल याला पकडून त्याच्या कमरेच्या मागील बाजूस देखील मिरचीपूड टाकून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पैसे देतांना मध्यस्थी करणार्‍या तरुणाने वाद मिटविला. जखमी राहुल याने फोन करून त्याच्या मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राहुलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!