Type to search

भाजी मार्केटमधील दुकानदाराच्या गल्ल्यातून पैसे लांबविणारा चोरटा जेरबंद

maharashtra जळगाव

भाजी मार्केटमधील दुकानदाराच्या गल्ल्यातून पैसे लांबविणारा चोरटा जेरबंद

Share
जळगाव । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केटमधील दुकानात पाणी जार व थरमासची माहिती विचारून दुकानाच्या गल्ल्यातून 3 हजार रुपये लांबविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवून अक्षय सुरेश छाडेकर वय 21 रा. पाळधी ता. जामनेर याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील दुकान नंबर 3 मध्ये रविंद्र मोहन चौधरी यांचे पाण्याचे जार, थरमास विक्रीचे दुकान आहे. या दुकानावर त्यांचा मुलगा सौरभ काम बघतो. दि.10 रोजी पाण्याचे जार व थरमासची किंमत विचारण्यासाठी आलेल्या तरुणाने दुकानाच्या गल्ल्यातून 3 हजार रुपये लांबवून नेले होते.

याप्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी दिपक किसन स्वामी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोली निरीक्षक बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रा.का.पाटील, बापु पाटील, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, विजय शामराव पाटील, अरुण राजपूत, सचिन महाजन यांनी तपासचके्र फिरवून अक्षय सुरेश छाडेकर याला ताब्यात घेतले.

त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आणखी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. संशयित अक्षय छाडेकर याला यापूर्वी देखील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!