Type to search

युवकाचे अपहरण : जळगावात दोघांना अटक

maharashtra जळगाव

युवकाचे अपहरण : जळगावात दोघांना अटक

Share
जळगाव । तीन लाख रुपयांसाठी पुण्यातील युवकाचे अपहरण करून त्याला दोघांनी जळगावात आणले. दोघे जळगावातील रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलवर असल्याची माहिती कळताच शहर पोलीसांनी याठिकाणी धाव घेवून अपहृत युवकाची सुटका करीत अपहरण करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले.

पुणे येथील यज्ञेश विनोदभाई तिलवा वय 30 याने कंपनी तयार करून अनेकांकडून पैसे जमा केले. त्यानुषंगाने दिलीप जगन अवसरमल व गणेश मोळे या दोघांनी या कंपनीत पैसे अडकविले होते. दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांना यज्ञेश याच्याकडून तीन लाख रुपये घेणे होते. दोघे यज्ञेशकडे पैश्यासाठी तगादा लावत होते. तरी देखील यज्ञेश याने पैसे दिले नव्हते. दिलीप व गणेश याने पैश्यासाठी यज्ञेश याला वारंवार फोन करीत होते. यज्ञेश हा फोन देखील उचलत नसून पैसे देत नसल्याने दि.13 रोजी दुपारी दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांनी एमएच 12 एनबी 0749 क्रमांकाच्या कारमध्ये यज्ञेश याला बळजबरी बसवून त्याचे अपहरण केले होते. याप्रकरणी दि.13 रोजी पिंप्री चिंचवड पोलीसात यज्ञेश याची पत्नी स्वाती तिलवा यांच्या फिर्यादीवरून दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांविरुध्द अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनी अपहृत यज्ञेश याला पुण्याहून कारने चाळीसगाव येथे आणले. त्यानंतर यज्ञेश व दोघांना समझोता झाला. त्यानंतर यज्ञेश याला घेवून दोघे मंगळवारी सकाळी जळगावात आले. यज्ञेश याला घेवून दोघे रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल अमरप्रेम येथे थांबलेले असतांना त्यांनी पुन्हा चाळीसगाव येथून तीच कार जळगावी बोलविली. मंगळवारी सायंकाळी कारचालकासह अन्य एक जण व अपहृत यज्ञेश तिलवा, दिलीप अवसरमल व गणेश मोळे हे पाचही जण जळगाव येथून पुन्हा पुणे येथे जाणार होते.

शहर पोलीसांना मिळाली माहिती
यज्ञेश तिलवा याचे गणेश मोळे व दिलीप अवसरमल या दोघांनी अपहरण करून त्याला जळगावात आणले असल्याची माहिती पिंप्री चिंचवड पोलीसांना मिळाली. त्यानुषंगाने पिंप्री चिंचवड येथील आयुक्त यांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करून घटनेबाबत कळविले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांना संशयितांचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या. दरम्यान संशयित रेल्वेस्टेशन परिसरात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली.

स्टेशन परिसरातील हॉटेलमधून दोघांना घेतले ताब्यात
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनिल पाटील, नवजीत चौधरी, गणेश पाटील, तेजस मराठे यांनी स्टेशन परिसरातून मंगळवारी रात्री दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांना एमएच 12 एनबी 0749 क्रमांकाच्या कारसह ताब्यात घेवून अपहृत यज्ञेशची सुटका केली. पोलीसांनी कारचालकासह अन्य एकाला देखील ताब्यात घेतले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!