Type to search

न्यायालयातील शिपायाचा बसमध्ये चढताना मोबाईल लांबविला

maharashtra जळगाव

न्यायालयातील शिपायाचा बसमध्ये चढताना मोबाईल लांबविला

Share
जळगाव । नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढतांना न्यायालयातील शिपायाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवून नेल्याची घटना दि.9 रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उमाळा येथील रहिवासी सचिन जयराम ससाणे हे जिल्हा न्यायालयात शिपाई म्हणून कामाला आहेत़ गुरूवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर घरी जाण्यासाठी ते नवीन बसस्थानकावर आले़ सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारा जळगाव-जामनेर बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला़ बसमध्ये चढल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला़ याबाबत शुक्रवारी त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला सचिन ससाणेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!