क्रिकेटच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने हृदयविकाराचा झटका : जळगावात एकाचा मृत्यू

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-भारत- पाकिस्तानमध्ये काल क्रिकेटचा सामना झाला या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्याचा धसका घेतल्याने जळगावातील जिजाऊ नगरमधील क्रिकेटप्रेमी असलेल्या 58 वर्षीय राजेेंद्र बारी यांचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना दि 18 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, वाघ नगर परिसरातील जिजाऊ नगरातील राहिवासी राजेंद्र देविदास बारी वय 58 हे आपल्या परिवारासह राहतात.

काल दि.18 रोजी रात्री भारत-पाकिस्तान हे क्रिकेटचा सामना पाहत होते. दरम्यान या सामन्यात भारताच्या पराभव झाला.

या पराभवाचा धसका घेतल्याने अचानक राजेंद्र बारी यांना हदयविकाराचा झटका आला. या हदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी पत्नीसह परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

राजेंद्र बारी हे तहसिल कार्यालयात स्टॅम्प वेंडर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर दि.19 रोजी सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*