प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करा !

0
जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करून दि.9 सष्टेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणांचा समावेश करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी वकीलांना केले.
जिल्हा वकील संघातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.महाजन, सचिव अ‍ॅड. अनिल पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.मिलिंद बडगुजर, खजिनदार अ‍ॅड. महेश ढाके, सहसचिव अ‍ॅड. रत्नाबाई चौधरी, कार्यकारीणी सदस्य अ‍ॅड. श्रीकृष्ण निकम, अ‍ॅड. रजनीश राणे, अ‍ॅड. मंगेश सरोदे,अ‍ॅड. शरीफ शेख, अ‍ॅड. प्रविण शिंदे, अ‍ॅड. राहुल अकुलकर, अ‍ॅड.योगेश पाटील, अ‍ॅड. अर्चना भदादे, अ‍ॅड. मंजुळा मुंदडा यांच्यासह सर्व न्यायाधीश व ज्येष्ठ वकील उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना अ‍ॅड. महाजन यांनी न्यायाधीश व वकील मंडळींनी सामंजस्याने काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सुरुवातीला अ‍ॅड. मिंलीद बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन अ‍ॅड. अनिल पाटील यांनी तर आभार अ‍ॅड. महेश ढाके यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*