जिल्हा न्यायालयातील संगणक प्रणाली राज्यात ‘जळगाव पॅटर्न’ – पालकमंत्री

0
जळगाव । दि.6 । प्रतिनिधी-जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील कार्यालयात अद्यावत संगणक प्रणालीची राज्यात जळगाव पॅटर्न म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण होणार असल्याचे मत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संगणक प्रणालीच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
संगणक प्रणालीच्या उद्घाटन सोहळा जिल्हा न्यालयातील सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्या दालनात आयोजीत करण्यात आला होता.
याप्रसंगी न्या. एम. के. लव्हेकर, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके उपस्थित होते.

पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अद्यावत संगणक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, या अद्यावत संगणक प्रणालीचा वापर आतापर्यंत राज्यात कुठेही झालेला नाही.

तसेच सरकारी वकीलांनी त्यांच्या इतक्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून ही अद्यावत संगणक प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीत अधिक तंत्रज्ञान कींवा मार्गदर्शकाची गरज भासल्यास मी स्वत: वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करीन अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.

त्यानंतर सॉफ्टवेअर तयार केलेल्या तंत्रज्ञ अविनाश पाटील यांचा ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्हा वकील कार्यालयातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 हजार रुपयांचा धनादेश ना. पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायालयातील सर्व सरकारी वकील उपस्थित होते.

अशी आहेत प्रणालीचे कार्य
न्यायालयात सुरु करण्यात आलेली प्रणालीचे नाव कोर्ट केस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर फॉर डिजीपी असे आहे. या प्रणालीमुळे न्यायालयीन कामकाजाची पेपरलेस असून.

नियमित केसेसचा डाटा, केसची सद्यस्थिती, सरकारी वकील व न्यायालयाच्या प्रकरणाची स्थिती, सरकारच्या बाजुने व सरकारच्या विरोधात लागलेले निकाल, दैंनदिन केसेस, कोणत्या न्यायालयात कोणते प्रकरण सुरु आहे याची अद्ययावत माहिती यात राहणार आहे.

तसेच महत्वाचे कागदपत्रे स्कॅन करुन संगणात अपलोड करता येते. त्याचप्रमाणे दर महिन्याचा आढावा ऑनलाईन सादर करता येणार आहे.

शासनाला दररोजही अचूक माहिती तत्काळ पाठविणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे लॅनच्या सहाय्यातून एकाचवेळी अनेक सरकारी वकीलांना संगणकावर या प्रणालीचा वापर करता येणार आहे.

अशी प्रणाली सुरु करणारे जिल्हा सरकारी वकीलांचे राज्यातील पहिले कार्यालय ठरले आहे. त्याचे पालकमंत्र्यांनी कौतुक करुन मुंबईसह बाहेरुन येणार्‍या तज्ञांबाबत अथवा इतर सुविधांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

 

 

LEAVE A REPLY

*