आरोग्य अधिकार्‍यांनी उगारला कारवाईचा बडगा

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-शहरात होत नसलेल्या स्वच्छतेच्या विषयावर मनपाच्या स्थायी सभेत सदस्यांसह आयुक्तांनी आरोग्य अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी केली.
त्यामुळे सभेच्या दुसर्‍याच दिवशी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सकाळ पासून शहरात ठिकठिकाणी जावून स्वच्छतेची पाहणी केली.
यावेळी त्यांना कामचुकारपणा करणारे आरोग्य निरीक्षक, मक्तेदार यांच्यासह कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे 20 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

काल झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरात स्वच्छता होत नसल्याच्या कारणावरुन आरोग्यधिकार्‍यांना धारेवर धरले होते. यावेळी आरोग्यधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नगरसेवक बंटी जोशी यांनी

आरोग्यधिकार्‍यांना साष्टांग दंडवत घातला होता. त्यामुळे आज आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सकाळ 6 वाजता युनिट क्रमांक 7 पासून स्वच्छतेच्या तपासणीला सुरवात केली.

यावेळी त्यांना डियुटीच्या वेळी हजर नसलेले आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचार्‍यांना यांना दोनशे ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला.

तसेच अचानक पाहणी करण्यासाठी आलेल्या आरोग्यधिकार्‍यांना गटारी साफ न करणे, ठरवलेल्या कचरा स्पॉटवरील कचरा न उचलणे, काम न करता कर्मचारी बसलेले, रस्त्याची साफ सफाई न करणे याबाबत यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बायोमेडिकल वेस्ट कचरा टाकणार्‍याकडून दंड वसुल
शहरात अचानक स्वच्छतेची पाहणी करीत असतांना आरोग्य अधिकारी यांना विसनजी नगरातील मन्साई हॉस्पीटलच्या बाहेर बायोमेडिकल वेस्ट कचरा टाकलेला दिसून आला.

यावेळी आरोग्य अधिकार्‍यांनी तात्काळ डॉ. राजीव नारखेडे यांच्याकडून तीन हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*