Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : रुग्णाच्या मृत्यूनंतर आला पॉझिटिव्ह अहवाल

जळगाव : रुग्णाच्या मृत्यूनंतर आला पॉझिटिव्ह अहवाल

जळगाव-

अमळनेर येथील 73 वर्षीय पुरुषाचा करोना तपासणी अहवाल 23 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनास प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

हा रुग्ण 20 रोजी रात्री 8 वाजता जिल्हा रुग्णालयात गंभीर स्थितीत दाखल झाला होता. त्याचा मुु्त्यू काही वेळात रात्री 8.30 वाजेच्या सुमारास झाला. त्यास दाखल करताच व त्याची अत्यवस्थ स्थिती लक्षात घेता डॉ क्टरांनी त्याचे तातडीने स्वँब घेतले होते. त्यानंतर त्या रुग्णाचा काही वेळातच मु्त्यू झाला. त्याचे स्वँब 21 रोजी धुळे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

त्याचा पॉझिटिव्ह अहवाल 23 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनास प्राप्त झाला. या रुग्णास टीबी, न्युमोनिया, श्वसनाचा त्रास देखील होता. त्याची ट्रँव्हल्स हिस्ट्री नाही. परंतु, कॉन्टँक्ट हिस्ट्रीचा शोध अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी घेत आहेत.

या मयताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी संबधित यंत्रणा, अधिका-यांना सर्तकतेचे आदेश दिले आहेत. या दोन्ही अधिका-यांनी बुधवारी जळगाव जिल्ह्याची चाळीसगाव व अमळनेर येथील सीमांवरील पोलीस बंदोबस्त व इतर यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा सीमा बंदीच्या आदेशाची कडक अंमल बजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सहा पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील मंगसे व अमळनेर येथील रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सुुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या