Wednesday, April 24, 2024
Homeजळगावकोरोना : जळगाव जिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संशयित एक रुग्ण दाखल

कोरोना : जळगाव जिल्हा रुग्णालयात आणखी कोरोना संशयित एक रुग्ण दाखल

जळगाव –

कोरोना संशयित जळगावातील आणखी एक रुग्ण सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात दाखल करण्यात आला आहे. या ६२ वर्षीय रुग्णास या अगोदर हदयविकाराचा त्रास होता.

- Advertisement -

त्यामुळे त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यास श्‍वास घेण्यास अधिक त्रास होत आहे. तसेच इतर लक्षणे लक्षात घेता कोरोना संशयित म्हणून त्याच्या लाळीचे नमुने घेवून ते पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मेहरुणमधील ४९ वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ही आल्याने त्याच्यावरही जिल्हा रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात उपचार सुरू आहे. हा रुग्ण कोरोनाच्या सेकंड स्टेप म्हणजे मध्यम प्रकारातील आहे.

त्याच्या कुटुंबातील व थेट संपर्कातील कोरोना संशयित २० रुग्णांवर महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या व्यक्तिरिक्त अन्य सहा संशयित रुग्णावरही या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

जिल्हा रुग्णालयात आतापर्यंंत एकूण ७१ संशयित रुग्णांच्या लाळीचे नमुने घेण्यात आले. त्यातील एका रुग्णाच्या लाळीच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर ४१ रुग्णांच्या लाळीच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत.

तसेच दोन नुमने नाकारण्यात आले आहेत. तर २७ अहवालांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील कोरोना नियंत्रण विभागाचे समन्वयक डॉ.विलास मालकर यांनी दिली.

१७३१ जणाचे स्क्रिनिंग

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुणे, सुरत व इतर ठिकाणाहून विद्यार्थी, कारागीर, मजूर, व्यावसायिक आदी गावाकडे येत आहेत. ते बाहेरील गावाहून आल्याने त्यांच्याकडे त्यांच्या गाव अथवा परिसरातील नागरिक संशयाच्या दृष्टीने बघतात. किंवा त्या बाहेरुन आलेल्यांना आरोग्य विषयक काही त्रास होतो अथवा मनात भीती असते, म्हणून त्यांच्या कोरोनासंदर्भातील प्राथमिक तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात  स्क्रिनिंग कक्ष उभारण्यात आला आहे. यात सोमवारी २६९, तर आतापर्यंत १७३१ जणांनी प्राथमिक तपासणी केली आहे, असेही डॉ.मालकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या