Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगावात कोरोना संशयित आणखी चार रुग्ण दाखल : एकाची प्रकृती गंभीर

Share

जळगाव | प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित आणखी चार रुग्ण गुरुवारी दाखल करण्यात आले. यात भुसावळ येथील एका तरुणास बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. चौघांच्या लाळीचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्याला पाठवण्यात आले  आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित २९ ते ३० वयोगटातील चौघांमध्ये  तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. भुसावळ येथील तरुण कोल्हापूरला गेला होता. कोल्हापूरहून भुसावळला घरी परतल्यानंतर त्याला चार-पाच दिवसांपासून श्‍वसन, ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यास गुरुवारी बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरा तरुण दुबईहून जळगावातील घरी परतला. त्यानंतर त्यास त्रास झाला. तसेच भूतान व इंडोनेशियाहून जळगावात घरी परतलेल्या दांपत्याला देखील त्रास झाल्याने त्यांनाही रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करुन घेण्यात आले. त्यांच्याही लाळीच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारपर्यंत येण्याची शक्यता आहे.

गुरुवारपर्यंत एकूण १३ जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर उर्वरित नऊ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हे नऊ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना नियंत्रण कक्ष दोन असून त्यात एकूण १० क्वॉटची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयितांची संख्या वाढत असल्याने आणखी एक नवीन वॉर्ड स्थापन करण्याची तयारी सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!