Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : आरोग्यमंत्र्यांच्या दौर्‍याप्रसंगीच कोरोना रुग्णांचा उच्चांक

जळगाव : आरोग्यमंत्र्यांच्या दौर्‍याप्रसंगीच कोरोना रुग्णांचा उच्चांक

जळगाव | प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर असतानाच दुपारी जिल्ह्यात ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात एवढ्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

मंत्री राजेश टोपे यांच्या दौर्‍यानिमित्त जळगाव शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आढावा बैठकीनिमित्तच्या कामात गुंतले होते. मंत्र्यांची आढावा बैठक दुपारी संपली. त्यानंतर जिल्ह्यात ७१ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या