तातडीचे 10 हजार रुपये देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0
जळगाव । दि. 19 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांना शासनाने मंजूर केलेले तातडीचे 10 हजार रूपये देण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज बँकेच्या अधिकार्‍यांना दिले.
जिल्ह्यातील बँकर्स समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीला अग्रणी बँकेसह,राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक, नागरी बँक, सहकारी बँकांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
बैठकीनंतर माहिती देतांना जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात बँकांच्या शाखा उघडण्याची मागणी आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील बहाळ, वावडे (अमळनेर), वरणगाव (भुसावळ), कोळगाव (भडगाव), वैजापूर (चोपडा) या गावांमध्ये शाखा उघडण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याच्या सुचनाही बँकेच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

तसेच सात बारा कोरा असणार्‍या शेतकर्‍यांसह थकबाकीदार शेतकर्‍यांनाही शासनाने मंजूर केलेले 10 हजार रूपये शासन आदेशानुसार देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात बहुतांश बँकांकडून कर्ज देण्यालाही सुरवात झाली असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

या बैठकीत पंतप्रधान आवास योजना, पीक कर्ज वाटप इष्टांक व साध्य केलेल्या इष्टांक, वार्षिक पत पुरवठा आरखडा, सुलभ पीक कर्ज अभियान बाबतबँक मेळावे, आर्थिक साक्षरता शिबीर, पोस्टर प्रदर्शित करणे, स्टॅण्ड अप इंडिया आदि बाबीवर चर्चा झाली.

शेतकर्‍यांना बँकानी पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करुन द्यावे व आपली सामाजिक बांधीलक व राष्ट्रीय कार्यातील योगदान करावे असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे श्री. चिले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक श्री. विक्रांत बगाडे यांनी सहभाग घेतला

मुद्रा लोनच्या वसुलीबाबत आदेश
जिल्ह्यात मुद्रा लोनचे मोठ्याप्रमाणावर वाटप होत आहे. परंतु वसुली होत नसल्याने त्यासंबंधीच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*