जळगाव शहरात सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंतीचा दहा दिवसांचा महोत्सव

0
जळगाव । जळगाव शहरात 19 फेब्रुवारी रोजी गेल्या अनेक वर्षाप्रमाणेच यंदाही सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. विविध क्रीडा स्पर्धा, कीर्तन, पोवाडा, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, शिवविचार स्पर्धा व भव्य शोभायात्रा असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे.

छत्रपती शिवराय यांची जयंती सर्व महाराष्ट्रभर उत्साहात साजरी केली जाते .पण जळगाव शहरातील शिवजयंती महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्माचे, वंशाचे पक्षाचे लोक एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी करत असतात .

गिरीश महाजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष असून उपाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रताप जाधव, सचिव राम पवार, खजिनदार खुशाल चव्हाण, समन्वयक शंभू पाटील आहेत. एकनाथराव खडसे, अशोक जैन, गुलाबराव देवकर, सतीश पाटील, सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंद्रकांत सोनवणे, सुरेंद्र पाटील महोत्सवाचे मार्गदर्शन असल्याचे समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

*