Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

जळगाव शहरात लवकरच रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर

Share

जळगाव । जळगाव परिमंडळात पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट 14 शहरात रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज मीटर बसविण्याचे काम सुरु आहे. लवकरच जळगाव शहरात देखील अद्यावत प्रणाली असलेले रेडिओ फ्रिक्वेन्सी वीजमीटर बसविण्यात येणार असल्याची महिती मुख्य अभियंता दी–पक कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच 13 हजार 418 शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याचे नियोजन असून दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती व एकात्मिक उर्जा विकास योजनेतून 26 नवीन सबस्टेशन कार्यान्वित करण्यात आली असून 7 सबस्टेशन अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर या प्रणालीद्वारे ग्राहकांना वीजवापरानुसार अचूक व वेळेत बिले मिळणार आहे.सिंगल फेज लघुदाब वर्गवारीतील 3 लक्ष 6 हजार 37 वीज ग्राहकांना हे नवीन मीटर बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल या शहरांमध्ये मीटर बसविण्याचे काम सुरु आहे. तसेच एकात्मिक उर्जा विकास योजनेतंर्गत परिमंडळात 196 कोटी 73 लाख निधीपैकी 126 कोटी 31 लाख रुपयांची कामे पूर्ण झाली असून जामनेर, सावदा, फैजपूर, रावेर येथे नवीन उपकेंद्र उभारण्यात आले आहे. तर भुसावळ येथे उभारण्यात येणार्‍या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात तर अमळनेर व भडगाव येथे उभारण्यात येणार्‍या सबस्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच शेतकर्‍यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. महावितरणच्या जळगाव परिमंडळात या योजनेतंर्गत 10 हजार 247 शेतकर्‍यांनी सौरकृषीपंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले असल्याचेही कुमठेकर यांनी सांगितले.

वीज बिल भरण्यासाठी महावितरण वॉलेट
महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरणे सुकर व्हावे, या हेतुने महावितरण वॉलेट ही वीजबिल स्वीकृती सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांना वीज बिल भरण्यात सुलभतेसह रोजगारांची संधी या वॉलेटमुळे उपलब्ध होणार आहे. वॉलेटधारक होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!