Type to search

जळगाव

चोपड्यात सात वर्षापूर्वीच्या खुनाच्या बदल्यासाठी खून

Share

चोपडा । धुळे येथील रहिवासी विशाल देवकर गवळी (33) याचा रुमालाने गळा आवळून व डोक्यावर दगड मारुन चोपड्यात निर्घृण खून केला. खून करून आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (28) रा.बारीवाडा चोपडा हा स्वतः शहर पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. सात वर्षांपूर्वी मामाच्या केलेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी वैभवने हा खून केल्याची कबुली दिली.

विशाल देवकर गवळी (रा.मोगलाई गवळी वाडा, धुळ)े याने मित्रांच्या सहकार्याने वैभव उर्फ टकल्या गवळीचा धुळे येथील मामा सदाशिव गवळी यांच्या अंगावर अँसिड फेकून धुळ्यात खून केला होता.यामुळे वैभव गवळीच्या मनात गेल्या सात वर्षापासुन राग होता. वैभव गवळी रा.चोपडा याच्यावर अगोदरच शहर पोलीसात गुरनं.82/2019 भादवि 307 कलमाखाली गुन्हा दाखल आहे.तेव्हापासून तो फरार होता. फरार वैभव उर्फ टकल्या गवळी धुळे येथे विशाल गवळी याच्या कडेच राहत होता. मामाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 10 जून रोजी विशालची रिक्षा भाड्याने करून दोघेही धुळ्याहून चोपडा येथे आले. येथे आल्यावर दोघे जण रिक्षाने शहराच्या बाहेर जाणार्‍या धरणगाव रस्त्यावरील हतनूर कालवाच्या पटचारी जवळ येऊन रिक्षेत( क्रमांक एम एच 18 ए पी 0597) यात विशाल देवकर गवळीचा रुमालाने गळा आवळून व डोक्यात दगड मारुन वैभव गवळी याने निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी हा स्वतः शहर पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी वैभव गवळीला अटक केली. खूनाच्या घटनेनंतर चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,पोलीस निरक्षक भीमराव नंदूरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली.यावेळी पोलिसांनी मयत विशाल देवकर गवळीचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

देवकर सिदाप्पा गवळी (वय-63) सेवानिवृत्त क्लार्क रा.मोगलाई गवळी वाडा धुळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं.94/ 2019 भादवि 302 कलमाखाली खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरक्षक भीमराव नंदूरकर, पोहेका सुनील पाटील, राजू महाजन, प्रदीप राजपूत, निलेश सोनवणे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!